संरक्षण भिंतीचे बोगस काम तात्काळ थांबविण्याची मातंग समाजाची मागणी
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथील मातंग स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम बोगस असून ते तात्काळ थांबवावे अशी मागणी मांतग समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली असल्याची माहिती प्रविण कांबळे यांनी दिली.
ते म्हणाले की, अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम मंजूरी नुसार सुरू आहे. परंतु सदरील काम हे निवेदनामध्ये नमुद केलेल्या प्रमाणे न करता संबंधित गुत्तेदारामार्फत बोगस करण्यात येत आहे. सदरील काम सुरू असताना आम्ही गावकर्यांनी प्रत्येक्ष हजर राहून पाहणी केली. या कामाची पाहणी आम्ही करत आहोत. काम करत असताना अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट, व स्टिलचा वापर करण्यात येत आहे. सदरील बोगस कामा बाबत विचारणा केली असता उलट-सुलट व उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. सदरील काम निविदेत नमुद केलेल्या प्रमाणता प्रमाणे
व उत्कृष्टपणे करण्याबाबत सुचित करावे अशी मागणीही प्रविण कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर प्रविण काबळे, राहुल जोगदंड, अशोक कांबळे, प्रशांत कांबळे, संदीप कसबे, लखन कांबळे, मयुर कांळुके, अक्षय सोनवेण, ऋषिकेश कांबळे, राम कांबळे, युवराज कांबळे, मनोज कांबळे, सय्यद करीमोद्दीन, शेख गौस बाबु, पांडुरंग कांबळे, संदीप कांबळे, आसरूबा कांबळे, शाम कांबळे, विशाल कांबळे, करण आडगळे, सागर कांबळे, गोविंद कांबळे, वैभव सोनवणे, आदीत्य कांबळे, कल्याण कांबळे, वैजनाथ कांबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
