Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

गेवराई दि.१२ (प्रतिनिधी): तालुक्यातील कोल्हेर येथे (Beed policeविनापरवाना ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतू‌क होत असल्याची माहिती असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी (दि. ११) मंगळवार रोजी पहाटे कारवाई करत ९,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासून (Beed) जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतूक करताना अज्ञात चालक व ट्रॅक्टर मालक स्वप्नील वाडकर यांच्यावर गेवराई पोलिसांनी (दि. ११) मंगळवार रोजी पहाटे कारवाई केली. यात स्वराज कंपनीचा ७४४ मॉडेल विना नंबरचा ट्रॅक्टर व केशरी रंगाची विना नंबरची ट्रॉली एकूण अंदाजे किंमत ९,५०,००० व ट्रालीमधील वाळू‌ची अंदाजे किंमत ३००० असा एकूण ९,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर चालक पोलिसांना पाहून ट्रॉलीतील वाळू खाली ओतून ट्रॅक्टर सोडून पसार झाला. अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Wednesday 12th of March 2025 04:58 PM

Advertisement

Advertisement