Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक

बीड अन् युपी पोलिसांची संयुक्त कारवाई

बीड - सतीश भोसले याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सतीश भोसले हा गेली काही दिवस पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. गेल्या 7 दिवसांमध्ये त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल झाले. पण एका मराठी वृत्तवाहिलीला मुलाखत देणारा भोसले पोलिसांना सापडत नव्हता. आज त्याला प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी यांनी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश भोसले याच्यावर अनेक आरोप होत आहेत. मात्र, तो पोलिसांना सापडलेला नसतानाच त्याने काल एका वृत्तवाहिनीवर त्याने मुलाखत दिली.

प्रयागराजमध्ये लपून बसलेला असताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण प्रकरणाचा त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता यानंतर तो फरार झाला होता. तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात फिरल्यानंतर तो प्रयागराजला गेल्याचे पोलिसांना समजले आणि त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली आहे.

खोक्या मागचा बोक्या शोधा- वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार म्हणाले की, खोक्या भेटला हे चांगलेच झाले. पण त्यांच्या मागचे बोके कोण हे शोधले पाहिजे. इकडे बाकाचा आका शोधला तसा खोक्याचा बोका शोधा. त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून आले. सोन्याचा खजाना कुठून येतो, हे शोधले पाहिजे.

खोक्याला अटक ही चांगली बाब

सतीश भोसले यांने जी चूक केली आहे त्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. मी कधीच कोणत्याच पोलिसांना फोन करत नाही. खोक्या भोसलेवर कारवाई करा असे मी म्हटलो आहे. त्याच्यावर जी कलमं आहे, त्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल.

कारला नंबरप्लेट ‎नसल्यामुळे वाढला गुंता‎

ससतीश भोसले उर्फ‎ खोक्या याची चार चाकी कार शिरूर‎ पोलिसांनी शिरूर तालुक्यातील रायमोहा ‎‎शिवारात सोमवारी‎‎ रात्री साडेदहा वाजता‎‎ जप्त केली आहे.‎‎ परंतू कारवर पुढच्या बाजुने ‎नंबर दिसून येत नाही. चालकाने नंबर‎प्लेट काढून सदरील कार शिवारात‎ लावली असावी असा संशय‎ पोलिसांना आहे.

अटकपूर्व जामिनसाठी अर्ज ‎

शिरूर येथील सतीष भोसले उर्फ ‎खोक्या याने त्यांच्या वकीलामार्फत ‎सोमवार 10 मार्च रोजी बीड जिल्हा ‎न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी ‎ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे. ‎या या संदर्भात आज बुधवारी ‎सरकारी वकीलांचे म्हणने ऐकून ‎घेतले जाणार आहे .



Wednesday 12th of March 2025 11:32 AM

Advertisement

Advertisement