Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वॉकिंग करतांना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यु

बीड - बीड जिल्हा पोलिस दलात वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले राजू बखरे हे आज

(दि.११) रोजी सकाळी पत्नीसोबत पोलिस मुख्यालय येथे वॉकिंग करत होते. त्याचवेळी त्यांना हदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वखरे हे पोलिस मुख्यालयात नेमणूकीस होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रपरिवारालाही धक्का बसला असून या घटनेने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Tuesday 11th of March 2025 03:29 PM

Advertisement

Advertisement