Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

माविम सुवर्ण महोत्सवी वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

बचत गटांच्या जिल्हास्तरीय नवं तेजस्विनी प्रदर्शन व विक्री महोत्सवास प्रारंभ

  • बीड - महिला व बाल विकास विभाग अंतर्गत असणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिना सह जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाला आज प्रारंभ झाला.
  •  तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योग Shops प्रकल्पाच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे संयम साहित्य महिला बचत गटाद्वारे उत्पादित वस्तू व मालाचे विक्री आणि प्रदर्शन या ठिकाणी 12 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
  • याचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी सुभाष साळवे जिल्हा व बाल विकास अधिकारी फारुख शेख तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाची चे विभागीय सल्लागार संदीप मराठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  • या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध उत्पादनांचे 52 स्टॉल लावण्यात आले आहेत ज्यामध्ये गावरान धान्य कडधान्य स्वादिष्ट मसाले रुचकर पापड कोरडई शेवया लोणची त्यासोबतच गावरान तू अंडी कापडी पिशव्या कापूस वेचणी कोट रेडिमेड ब्लाऊज इमिटेशन ज्वेलरी आणि इतर खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल आहेत.
  •  
  • बीड शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब येऊन या प्रदर्शनात सहभागी व्हावे व खरेदी करावी जेणेकरून महिला सक्षमीकरणात सहकार्य होईल असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय समन्वयक एस. बी. चिंचोलकर यांनी केले आहे.

Tuesday 11th of March 2025 02:57 PM

Advertisement

Advertisement