अंजली दमानिया पुराव्याशिवाय बोलत नाहीत - संदीप क्षीरसागर
बीड - अंजली दमानिया ह्या पुराव्याशिवाय बोलत नाही, त्यांनी जे म्हटले आहे ते बरोबरच आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही तर मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे, वाल्मीक कराड काय इतका मोठा नाही त्याच्यावर कुणाचा वरदहस्त असल्याशिवाय काही घडू शकत नाही हे मी आधीपासून म्हणतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, वाल्मीक कराड एका मोठ्या रुग्णालयात आराम करत बीडचा मोर्चा टीव्हीवर बघत होता. त्या काळात त्यांना कोण भेटले, काय सुरक्षा दिली गेली. त्याला पुण्यातील रुग्णालयात कोणी ॲडमिट केले असा सवालही त्यांनी केला आहे. जर सीडीआर तपासला तर सर्व गोष्टी समोर येतील.
संदीप क्षीरसागर म्हणाले की, वाल्मीक कराडला व्हीआपी वागणूक दिली जात असल्याचे माध्यमांमध्येही दिसून आले आहे. त्यांना मंत्रिपदाचे संरक्षण मिळते आहे. त्यांच्या अंगावरचे गमजे, दौरे का काढले गेले नाही. माझी शंका आहे की फरार आरोपी आता सापडेल म्हणून.
धसांच्या कार्यक्रमाला जाणार
संदीप क्षीरसागर म्हणाले की, सुरेश धस यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला मी जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना विकास कामांसाठी भेटावेच लागते. तर सुरेश धस यांनीही मला कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे वातावरण तयार झाले, त्यानंतर अनेकांनी आपल्यावर काय अन्याय झाला हे सांगितले आहे. भीतीपोटी लोकं शांत बसले होते पण आता आपल्याला न्याय मिळेल या भावनेतून एक-एक प्रकरण समोर येत आहे.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, धनंजय मुंडे पालमकंत्री असताना ते जे वागले ते अगदी चुकीचे आहे. आम्हाला कोणत्याचे कामाचे भूमिपूजन त्यांनी करु दिले नाही. कुणीही उठून नारळ फोडत होते. कुणाही हेडवर त्यांनी पैसे वळवले आहे, ते पुराव्यासह दिले आहे. भविष्यात या सर्व गोष्टी उघड होतील. आता अधिकारीदेखील घाबरले आहेत.
