खा.सोनवणेंनी काढले रेल्वे मार्गातील प्रलंबित 'गतिरोधक' अन् रेल्वेने धरली 'स्पीड'
४ व ५ फेब्रुवारीला बीड पर्यंत जलदगती चाचणी
बीड: सन १९९५ ला अहिल्यानंतर-परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. काम सुरु झाले मात्र त्या कामासाठी म्हणावा तसा पाठपुरावा न झाल्याने काम रखडत गेले. २८/२९ वर्षात रेल्वेचे काम अंमळनेर पर्यंतच येऊन थांबले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खा.बजरंग सोनवणे यांनी पहिलीच बैठक रेल्वे विभागाची घेतली. कामास गती देण्यासाठी येत असलेल्या अडथळ्यांची माहिती घेतली. कामास गती देण्यासाठी रेल्वेमंत्री व रेल बोर्डाचे चेअरमन यांची वारंवार भेट घेऊन रेल्वे कामाला गती देण्याचे काम केले. पालवन परिसरात जमीनीच्या मावेजाची थकित राहिलेली प्रकरणे मार्गी लावत रेल्वे कामाला गती दिली. आता दि.४ व ५ फेब्रुवारी रोजी नवगण राजुरी ते बीड लोहमार्गावर जलदगती रेल्वेची चाचणी होत आहे.
बीडला रेल्वे आलीच पाहिजे, ही घोषणा बीडकर कायम देत. त्यासाठी केवळ घोषणा दिल्या नाही तर रस्त्यावर लढा दिला. वेळप्रसंगी पोलीसांच्या काठ्या खाल्ल्या आणि जेलही भोगले. याच संघर्षातून सन १९९५ मध्ये अहिल्यानगर ते परळी रेल्वे मार्गाला मंजूरी मिळाली. पुढे अनेक वर्षे बीड रेल्वे केवळ मंजूरीच्या स्थितीत होती. मागील काही वर्षात चार दोन वर्षात पाच दहा किलोमिटरने रेल्वेचे काम पुढे सरकत होते. मागील कालावधीत ही रेल्वे अंमळनेर पर्यंत येऊन थांबली होती. रेल्वे मार्गातील भुसंपादन आणि मावेजाचे अनेक विषय प्रलंबित होते.लोकसभा निवडणूकी मधे खा.बजरंग सोनवणे यांनी विजयी झाल्यानंतर पहिली बैठक रेल्वेची घेत, रेल्वे ही बीडकरांचे स्वप्न आहे ते पुर्ण करण्यासाठी रात्रंदिवस यंत्रणा राबविण्याच्या सुचना दिला. केवळ सुचना देऊन न थांबता भुसंपादन आणि मावेजाचे प्रकरणे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अवध्या सहा ते सात महिन्यात आता अंमळनेर ते बीड असा रेल्वेचा प्रवास सुरू आहे. दि.३०-३१ डिसेंबर रोजी विघनवाडी ते नवगन राजुरी या नवीन लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली. पहिल्या बैठकीतच दि.२६ जानेवारीपर्यंत बीडला रेल्वे येईल, असे सांगितले होते. परंतु पालवन परिसरात दोन शेतकऱ्यांचे मावेजाचे प्रकरण प्रलंबित होते. सदरील शेतकऱ्यांना मावेजा मिळून त्या जागेचा ताबा मिळावा, यासाठी खा.सोनवणे यांनी प्रयत्न केले. यानंतर आता रेल्वेमार्गातील भुसंपादनाचा गतिरोधक निघालेला असून दिलेल्या मुदतीपेक्षा दहा दिवसात रेल्वे बीडला येत आहे.
-
दि.४ व ५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेच्या कामातील विघनवाडी (ता.शिरुर) ते नवगण राजुरी (ता.बीड) व नवगण राजुरी ते बीड या पूर्ण झालेल्या लोहमार्गावर निरीक्षण व जलदगती चाचणी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी रेल्वे मार्गापासून दूर रहावे, गुरे व पाळीव प्राणी रुळावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. परिसरातील नागरिकांनी सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे.
- खा.बजरंग सोनवणे, बीड.
- खा.बजरंग सोनवणे, बीड.
Monday 3rd of February 2025 05:31 PM
