कमी वय आणि वजन तसेच फुफ्फुसे कमजोर असलेल्या बाळाला अंबाजोगाई येथील लाड हॉस्पिटलने दिले जीवदान
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - जन्मावेळी कमी महिने भरलेले, २६ आठवडे वय, वजन ९०० चे ग्रॅम, त्यात ही गंभीर बाब म्हणजे फुफ्फुस कमजोर असलेल्या बाळाला डॉ.लाड यांच्या योग्य निदान आणि औषधोपचारामुळे लाड रूग्णालयात जीवदान मिळाले. आपले बाळ सुखरूप आहे. हे पाहून बाळाच्या पालकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकत होता.
याबाबत अधिक माहिती देताना लाड हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ.लाड यांनी सांगितले की, जन्मावेळी कमी महिने भरलेले, २६ आठवडे वय, वजन फक्त ९०० ग्रॅम, त्यात ही गंभीर बाब म्हणजे फुफ्फुसे कमजोर असलेल्या परळी वैजेनाथ येथे आईचे सिझर ऑपरेशन झाल्यानंतर नवजात बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून अंबाजोगाईच्या लाड हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. त्या बाळाच्या प्रथम सर्व तपासण्या केल्यानंतर समजले की, त्या बाळाचे फुफ्फुस हे खूपच कमजोर आहे. नाड्या लागत नव्हत्या, त्यानंतर लाड हॉस्पिटलकडून आम्ही ही गंभीर बाब बाळाच्या पालकांना निदर्शनास आणून दिली. योग्य निदान केले. काय औषधोपचार करावे लागतात. याबाबत अधिक माहिती दिली. उपचारापूर्वी पालकांची अनुमती घेऊन तातडीने बाळाच्या फुफ्फुसांमध्ये इंजेक्शन देण्यात आले, शॉक विरोधात ट्रिटमेंट सुरू केली आणि बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर काही तासांतच बाळाच्या प्रकृती मध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. बाळाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. हे लक्षात येताच बाळाला लावलेली मोठी मशीन काढण्यात आली. आणि छोटी मशीन लावण्यात आली. बाळाला हळूहळू ऑक्सिजनवर शिफ्ट करण्यात आली. त्यानंतर त्या बाळाला आईचे दूध देणे सुरू करण्यात आले. जसं - जसे बाळाला दूध पचत होते. तस तसे दुधाची मात्रा वाढविण्यात आली. ज्यावेळेस बाळाला जेवढे दूध लागते. तेवढेच दूध ते घेत होते. तब्बल दिड महिन्यांच्या योग्य व तत्पर उपचारांनंतर हे बाळ त्याच्या आईकडे शिफ्ट करण्यात आले. ज्यावेळेस बाळाचे वजन वाढले आहे. अशी डॉ.लाड यांची पूर्ण खात्री झाली आणि पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतरच त्या बाळाला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कमी वय आणि वजन, फुफ्फुसे कमजोर असणाऱ्या व अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या नवजात बाळाला लाड हाॅस्पिटल मध्ये एक प्रकारे नवे जीवदानच मिळाले. त्यामुळे बाळाच्या पालकांनी डॉ.लाड व हॉस्पिटल मधील कर्मचारी सादिक शेख, विजय क्षीरसागर, मोहन या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यापूर्वी ही लाड हॉस्पिटल मध्ये अनेक बालकांवर योग्य औषधोपचार करण्यात आले आहेत. ज्यात अन्ननलिका पूर्ण विकसित झालेली नसणे, नाड्या कमजोर असणे, शरीरामध्ये जीवाणूचा संसर्ग झालेला असणे. कमजोर असलेल्या बाळांमध्ये ऑपरेशन करणे, जोखीम पत्करून योग्य निदान व औषधोपचार करणे, प्रसंगी बाळांचे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करणे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, एक्स-रे, निष्णात भुलतज्ज्ञ अशा विविध सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम डॉ.सायली लाड व त्यांच्या लाड हॉस्पिटल मधील स्टाफ हे अव्याहतपणे करतात. सर्वजण खूप मेहनत घेतात हे उल्लेखनीय आहे.