Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

साळेगावच्या गुरांच्या बाजारात दोन व्यापाऱ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी

केज  - साळेगाव (ता. केज) येथील जनावरांच्या आठवडी बाजारात दोन व्यापाऱ्यांच्या गटात जनावरे खरेदी - विक्री करण्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करीत दगड, काठ्याने हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत दोघांचे डोके फुटले असून एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.


      साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात गुरुवारी सकाळी १०.४५ वाजेच्या रघुनाथ निवृत्ती मोराळे आणि मिर्झा समशेर बेग या दोघा व्यापाऱ्यात गाय खरेदीच्या व्यवहारा वरून आपसात बोलाबोली झाली. त्या नंतर एकमेकांना शिवीगाळ झाली आणि त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. यात दोन्ही गटाने एकमेकांना काठ्या आणि दगडाने मारहाण केली. तसेच दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यामुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला. यात मिर्झा समशेर बेग (वय ३२), आशिम तौफीक शेख (वय २१) या दोघांचे डोके फुटले आहे. तसेच रघुनाथ निव्रत्ती मोराळे (वय ६०) यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर मिर्झा मुसब्दीक रफीक बेग (वय ३३), नितीन रघुनाथ मोराळे (वय २६) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. 


दरम्यान सरपंच कैलास जाधव यांनी ही माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस जमादार बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक शिवाजी कागदे, पोलीस नाईक, रामहरी भंडाने, वाहतूक शाखेचे गोरख फड हे घटनास्थळी हजर झाले. पोलीस नाईक रामहरी भंडाने यांच्या फिर्यादीवरून मिर्झा समशेर बेग, आसिम तौफीक मिर्झा, मुसब्दीक रफीक बेग ( तिघे रा. नेकनुर ता. जि. बीड), रघुनाथ निवृत्ती मोराळे व नितीन रघुनाथ मोराळे (दोघे रा. दहीफळ वडमाऊली ता. केज) या दोन्ही गटातील पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Thursday 1st of August 2024 09:20 PM

Advertisement

Advertisement