Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आपले सरकार पोर्टल असुरळीत; विद्यार्थ्यांचे नुकसान

आ.नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची केली विनंती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) - संपुर्ण बीड जिल्ह्यात आपले सरकार पोर्टल (महाऑनलाईन) असुरळीत झाले. असून सदरील व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालावे. अशी विनंती केज मतदार संघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी विनंती केली आहे.

या संदर्भात आ.नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन दिले असून या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, जिल्ह्यात सद्यस्थितीत ऑनलाईन प्रमाणपत्राचे महाऑनलाईन/आपले सरकार पोर्टल सुरळीत सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे विविध आवश्यक प्रमाणपत्रे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे विहित वेळेत मिळत नसल्याचे तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. सदरचे कामकाजाबाबत तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे विचारणा केली असता सदरचे पोर्टल हे कार्यालयीन वेळेमध्ये 404 ऐरर दाखवत असून सर्वर लोड घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी काम करत असताना पोर्टल हे अत्यंत संथगतीने चालत असल्याचे त्यांनी कळविले आहे.

        तरी सदर प्रकरणात विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने सदर पोर्टल सुरळीत सुरू होण्यासाठी आपल्यास्तरावर कार्यवाही करण्यात यावी. सदर प्रमाणपत्राअभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी कार्यवाही करण्याबाबत आदेश व्हावेत, अशी विनंती आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

Thursday 1st of August 2024 05:28 PM

Advertisement

Advertisement