Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

केज  - केज तालुक्यातील देवगाव येथील प्रवीण लक्ष्मण मुंडे हा ३० जुलै रोजी दुपारी कोरडेवाडी (ता. केज) येथे बहिणीकडे गेला होता. रात्री ८.३० वाजता परत गावाकडे दुचाकीवरून (एम. एच. १४ जी.डब्ल्यू. ३१९०) येत असताना विडा येथे कोरडेवाडीकडे भरधाव वेगाने चाललेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रवीण मुंडे याच्या डोक्याला गंभीर जखम होऊन तो जागीच ठार झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन घेऊन चालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विडा बिटचे सहाय्यक फौजदार राजू वाघमारे, जमादार राजू वंजारे यांनी घटनास्थळी भेट देत विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून शवविच्छेदन करून घेत या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केला.

Wednesday 31st of July 2024 09:36 PM

Advertisement

Advertisement