Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांच्या अडचणींची तात्काळ सोडवणुक करा

आ.नमिता मुंदडा यांची पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांच्या विविध अडचणींची तात्काळ सोडवणुक करा अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकड मागणी केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात शिधापत्रिका धारकांना खालील समस्यांना तोंड द्यावे लागले असून सदर समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता आवश्यक सणारी शिधापत्रिका ऑनलाईन प्रणालीवर शिधापत्रिका ही लवकर उपलब्ध होत नाही., सदर प्रणालीमध्ये तात्काळ सुधारणा होणे आवश्यक आहे, शिधापत्रिका ऑनलाईन प्रणाली ई-पॉज मशीन चालत नसल्याने लाभार्थी शिधापत्रिका धारकांना वेळेवर अन्नधान्य प्राप्त होत नसल्याने शिधापत्रिकाधारकांकडून रोष व्यक्त करण्यात येत असून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर प्रणालीमध्ये तात्काळ सुधारणा करून अन्न-धान्य वितरण सुरळीत व्हावे., जिल्हयामध्ये बांधकाम मजूर, शेतमजूर, ऊसतोड कामगार, बिगारी कामगार, एकल व विधवा-महिला यांना तात्काळ शिधापत्रिका वितरीत कराव्यात व त्यांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ठ करून अन्नधान्याची व्यवस्था करावी., अन्नसुरक्षा योजनेत लाभार्थी समाविष्ट करण्यासाठी जिल्हयाला वाढीव इष्टांक मंजूर करावा., माहे जून- 2022 पासून शेतकरी राशनकार्ड (एपीएल) धारक लाभार्थ्यांकरिता राज्य शासनाकडून धान्य बंद झाले आहे. बीड हा शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रवण जिल्हा असल्याने जिल्हयाकरिता शेतकरी योजनेकरिता धान्य सुरु करावे., ई- पॉज मशीनला कुटुंबातील सदस्य वाढविण्याची सुविधा देण्यात यावी., भूमीहीन नागरिकांचे शेतकरी एपीएल योजनेतील कार्ड पीएचएच योजनेत समाविष्ट करण्यात यावेत, बीड जिल्हा हा शेतकरी आत्महत्या प्रवण जिल्हा असून जिल्ह्यामध्ये बेरोजगारी, नापिकी, कर्जबाजारीपणा, यासारख्या अनेक समस्याने नागरिकांना ग्रासले आहे. नागरिकांचे जीवन सुसाहय्य व्हावे. याकरिता वरील मागण्यांवर त्वरीत निर्णय घेऊन मान्य करण्यात याव्यात. अशी मागणी या निवेदनात आ. नमिता  मुंदडा यांनी केली आहे.

Wednesday 31st of July 2024 06:31 PM

Advertisement

Advertisement