मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात एक दिवशीय अभ्यासक्रम विकास कार्यशाळा
अंबाजोगाई - नव राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत समाजकार्य पदव्यूत्तर अभ्यासक्रम यावर्षी पुनर्गठीत करण्यात आला . त्याचे औचित्य साधून मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमाची ओळख व पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रा. डॉ. पी.एम. शहापूरकर समाजकार्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाद्वारे मसमाजकार्य पदव्यूत्तर अभ्यासक्रमामध्ये या वर्षीपासून सहा विविध स्पेशलायझेशन सुरू करण्यात आले. त्यामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन HRM ,कुटुंब व बालविकास FCW, ग्रामीण विकास URD , वैद्यकिय व मनोचिकित्सक समाजकार्य MPSW , सामुदायिक विकास CD उद्यम जगताची साामाजिक बांधिलकी CSR इ. विषयाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. त्यादृष्टीने या अभ्यासक्रमाची ओळख व त्यातील त्रुटी दूर करण्याच्या हेतुने मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या पुढाकाराने एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये क्षेत्रकार्य, गुणांचे नियोजन, सापेक्ष मुद्दयांची भर व संदर्भ साहित्य यावर सखोल चर्चा करण्यात आली व अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आला. या कार्यशाळेत प्रा. डॉ. पी.एम. शहापूरकर, अध्यक्ष, तदर्भ अभ्यासमंडळ, समाजकार्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर तसेच डॉ. नजीर शेख, डॉ. किसन शिनगारे सदस्य, तदर्भ अभ्यास मंडळ हे उपस्थित होते. या कार्यशाळेत डॉ. शहापूरकर यांनी अभ्यासक्रमाची वैशिष्टये व तत्कालिन विषयाची मांडणी यावर भर देवून समाजकार्यामध्ये रोजगार निर्मितीक्षम अभ्यासक्रम बनविण्यावर अधिक भर दिल्याचे प्रतिपादन केले. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव उपस्थित होते समन्वयक म्हणून प्रा. डॉ. अरूंधती पाटील यांनी काम पाहिले. यावेळी जालना, औरंगाबाद व मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्राध्यापक या कार्यशाळेस उपस्थित होते
Wednesday 31st of July 2024 05:08 PM