Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बहारदार गायनाने रंगत

अंबाजोगाई (प्रतिनिधी) - येथील संगीत साधना मंचच्या वतीने आयोजित संगीत सभेत छत्रपती संभाजीनगर येथील गायक पंकज देशपांडे यांचे गायन बहारदार झाले.

त्यांनी राग मधुवंती, मियामल्हार या रागांतील बडे छोटे ख्याल, रंगतदार बढत, व मधूर आवाजातून त्यांचा प्रकट झालेला कस,जय शंकरा,देवाघरचे ज्ञात कुणाला ही नाट्यगीते यांनी ही संगीत सभा अगदी उठावदार झाली.

संवादिनी साथ विश्वजीत धाट यांनी तर तबल्यावर रत्नदीप शिगे यांच्या पुरक साथीने संगीत सभा खूपच रंगतदार ठरली.

या कार्यक्रमास तबलावादक प्रकाश बोरगावकर, दगडु लोमटे,डॉ.अतुल कुंबेफळकर,डॉ.सत्येन्द्र बर्दापूरकर, सौ.लता पत्की प्रा.अविनाश ल.जोशी,दिवाकर धारुरकर यांच्यासह शहरातील रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuesday 30th of July 2024 05:04 PM

Advertisement

Advertisement