तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था,अंबाजोगाई च्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे दि.०७/०७/२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा संघ सहभागी झाला होता.यात कु.सिध्दी फपाळ(इ.८वी) प्रथम क्रमांक २००१ /- व कु.रोहिणी हाडबे (इ.८ वी) द्वितीय क्रमांक १५०१/-पटकावला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,मुख्य प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी,डॉ.कल्पनाताई चौसाळकर,अप्पाराव यादव,वर्षाताई मुंडे,अविनाश तळणीकर,स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष विजयराव वालवडकर कार्यवाह किरण कोदरकर,शालेय समितीचे अध्यक्ष डॉ अतुल देशपांडे,मुख्याध्यापक तथा केंद्रीयकार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे,शालेय समितीचे सर्व सदस्य,उपमुख्याध्यापक माधव जोशी,पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे, पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे,अभ्यासपुरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे,कल्पना जवळगांवकर,अमरजा कुलकर्णी.तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.
