पिकावरील कीड व रोग याच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाशी संपर्क साधा ----- श्रीनिवास अंडील
धारूर - सध्या खरीप हंगामामध्ये पाऊस वेळेवर झाल्या असल्यामुळे सोयाबीन कापूस व इतर पिके चांगली आहेत पण काही भागात पावसाचं प्रमाण कमी आहे त्या भागात सोयाबीन व कापूस या पिकावर रोगराई व अन्नद्रव्याची कमतरता याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे प्रामुख्याने ज्या शेतावर रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पीक घेतले होते त्या शेतातील सोयाबीन या पिकावर आळी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे अशा गोंधळलेल्या परिस्थितीत शेतकरी कुठले तरी औषध आणि टॉनिक वापरत आहे योग्य औषध न गेल्यामुळे कीड नियंत्रणात येत नाही सोयाबीन या पिकावर अन्नद्रव्याची ही कमतरता दिसून येत आहे
सोयाबीन या पिकावर अळी या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनी क्लोरोफोरिफॉस ५०%ई सी प्रोफेनोफोस ५०% ई सी किंवा इमामेक्टिन बेंजोएट ५%ई सी
व अन्नद्रव्याच्या कमतरतेसाठी ग्रेट टू या औषधे चा वापर करावा शेतकरी बांधवांना काही समस्या असेल तर कृषी विभाग धारूर यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान धारूर कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्रीनिवास अंडील यांनी केले आहे
