समृध्द व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक- - डॉ. उदय खोडके
वि. दे. कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, लातूर येथे कृषि सप्ताह संपन्न
लातूर -येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, लातूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना अंतर्गत हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषि दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषि सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
या दरम्यान डॉ.उदय खोडके, संचालक शिक्षण, वनामकृवि., परभणी यांचे हस्ते विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात वटवृक्ष लागवड करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शनपर डॉ.उदय खोडके म्हणाले की प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी ५ वृक्ष ही संकल्पना आवश्यक आहे. यात एक पेड मॉं के नाम, एक पेड पिता के नाम, एक पेड गुरू के नाम, एक पेड दोस्त के नाम और एक पेड खुद के नाम हे उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच, कृषि सप्ताह दरम्यान दोन्ही महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, गाजर गवत निर्मूलन, प्लास्टिक निर्मूलन व कचरामुक्ती अभियान इत्यादी उपक्रमाचे कौतुक केले. समृध्द व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ.उदय खोडके यांनी कार्यक्रम प्रसंगी केले. या कार्यक्रमास कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता डॉ.राकेश अहिरे, कृषि महाविद्यालय, अंबाजोगाईचे अधिष्ठाता संजीव बंटेवाड, वनस्पतीशास्र विभागप्रमुख डॉ.हिराकांत काळपांडे, डॉ.शिवाजी शिंदे, उपकुलसचिव (विद्या) डॉ.गजानन भालेराव, संचालक शिक्षण कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी डॉ.गणपत कोटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अच्युत भरोसे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.रमेश ढवळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सारिका भालेराव, डॉ.भास्करराव आगलावे, डॉ.महेंद्र दुधारे, डॉ.राहुल चव्हाण, डॉ.विद्या हिंगे, डॉ.योगेश भगत, मनीषा बगाडे, सुरेखा आंबटवाड, अश्विनी गरड, तानाजी गंपले, संगीता सोरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
