स्व.डॉ.सौ. विमलताई यांना मुंदडा यांना मरणोत्तर रोटरी भूषण पुरस्कार जाहीर
मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण सोहळा
अंबाजोगाई -: येथील लोकनेत्या स्व.डॉ.सौ. विमलताई नंदकिशोरजी मुंदडा यांना या वर्षीचा सन - २०२४-२५ यावर्षीचा "मरणोत्तर रोटरी भूषण" पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता परिचय मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे,सचिव धनराज सोळंकी यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराचे वितरण केले जाते. या वर्षीचा हा रोटरी भूषण पुरस्कार स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. अंबाजोगाई शहराचे भूषण असलेल्या
स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा या परिसराच्या भाग्यविधात्या म्हणून ओळखल्या जातात. डॉ. विमलताई व केज विधानसभा हे जनु काही समीकरणच जुळलें होते.बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक कर्तृत्ववान महिला सलग पाच वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून येते. हा वेगळा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे. सामान्य जनता व विमलताई हे नाते समाजमनात दृढ झाले होते.२४ वर्षे आमदार,व दहा वर्षे मंत्री म्हणुन त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात आपली नवी ओळख निर्माण केली होती.कसलाही राजकीय वारसा नसतानाही आपल्या कर्तुत्वावर व जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य निर्माण केले होते.विकासकार्याच्या माध्यमातुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.ताई या नावाचे वलय त्यांनी निर्माण केले होते.व ते नाते समर्थपणे जपण्याची किमया विमलताईनी साध्य केली होती.
कर्करोगा सारख्या आजाराने त्रस्त असुनही त्यांनी समाजाशी असणारी बांधीलकी कधी तुटु दिली नव्हती.पण या आजारानेच ताईना आपल्यातुंन हिरावुन नेले.परंतु ताईनी गेल्या २४ वर्षात आरोग्यमंत्री,बांधकाममंत्री,राज्यमंत्री,आमदार, म्हणुन केलेली अनेक कामे आजही त्यांची आठवण करुण देतात.या भागाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही.त्यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीने त्यांना मरणोत्तर रोटरी भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
