संत शिरोमणी श्री नामदेव महाराज दिंडी जवळबनला
भव्य अश्व रिंगण सोहळ्याने भविकांचे पारणे फेडले
केज - संत शिरोमणी श्री.नामदेव महाराज संस्थान नरसी (नामदेव) ता.कळमनुरी जि.हिंगोली यांची पायी दिंडी सोहळा आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या दरम्यान आज सोमवारी दि.8 जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता अंबाजोगाई -कळंब मार्गावरील बोरीसावरगाव - पावनधाम मार्गे केज तालुक्यातील जवळबन येथे पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालखीरथ विसावल्यावर स्व. निवृती सोपान करपे यांच्या कुटुंबियांच्या वतीने विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली.गेल्या २९ वर्षापासून जवळबन येते संत शिरोमणी श्री.नामदेव महाराज पालखी पायी दिंडी चे स्वागत मोठया उत्साहात ,जल्लोषात पंचक्रोशीतील भाविक व गावातील ग्रामस्थ करतात.स्व. निवृत्ती सोपान करपे यांनी सुरु केलेल्या पायी दिंडी सोहळा त्यांच्या पश्चात जवळबन ग्रामस्थ मोठ्या उत्साहात दरवर्षी संत नामदेव महाराज पायी दिंडीचे आयोजन करतात.यावेळी भव्य अश्व रिंगण सोहळ्याने भाविकांचे पारणे फेडले. महिला, पुरुषांची फुगडी यासह विविध कार्यक्रम पार पडले.गावातील हनुमान मंदिरात ह.भ.प.बळीराम सोळंके(नरसी नामदेव)जि. हिंगोली यांच्या किर्तना नंतर वारकऱ्यांचे भोजन संपन्न झाले.तद्नंतर पायी दिंडी सोहळा पंढरपूर कडे मार्गस्थ झाला.