नगरपंचायतीच्या शिपायाची आत्महत्या
केज - केज येथील नगरपंचायतीच्या शिपायाने आपल्या बहिणीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून धम्मपाल नंदकुमार मस्के (वय ३०, रा. भीमनगर, केज) असे नाव आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली असून आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
केज शहरातील भीमनगर भागातील धम्मपाल नंदकुमार मस्के (वय ३०) हा नगरपंचायतीत शिपाई पदावर कार्यरत होता. त्याचे दीड वर्षापुर्वी लग्न झाले होते. रविवारी दुपारी धम्मपाल मस्के यांनी शहरातील विवाहीत बहिणीच्या घरात पाण्याच्या जारवर उभे राहून आडुला गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून भीमनगर भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन विवाहीत बहीणी असा परीवार आहे. याप्रकरणी केज पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक निर्मला गंभीरे पुढील तपास करताहेत.
