महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
बीड - महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 च्या दुसरा टप्याला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे सहाय्यक जिल्हा निबंध तथा मुद्रांक शुल्क अधिकारी बीड यांनी कळविले आहे.
योजना महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ ही योजना दोन टप्यात राबविण्यात आली आहे. पहिला टप्पा ०१ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होता. आणि योजनेचा दुसरा टप्पा दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधी असून ही योजना राबविण्यात आली होती. योजनेच्या दुसऱ्या टण्यासाठी दिनांक ३०/०६/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता योजनेच्या दुसरा टप्पाला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यासह महसूल आणि वन विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब (असाधारण क्रमांक 243) च्या आदेशातील जोडपत्र (Annexure) खंड (फ) च्या नंतर clause "g" नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे याअंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या जमिनीवर वसलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेने निवासी किंवा अनिवासी घटकांबाबतचे पहिले वाटप पत्र किंवा शेअर सर्टिफिकेट किंवा स्टॅम्प नसलेल्या कागदावर किंवा लेटर हेडवर जारी केलेले किंवा अंमलात आणलेले करार महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि विभागीय मंडळे किंवा शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) किंवा महानगरपालिका, नगर पंचायत किंवा विकास किंवा नियोजन प्राधिकरणांनी मंजूर केलेले किंवा गठित राज्य सरकारच्या विहित नियमांनुसार राहणार असल्याचे ही कळविण्यात आलेले आहे. सोबत जोडपत्र जोडलेले आहे.
