सह्याद्री पब्लिक स्कूल येथे पालक मेळावा
अंबाजोगाई - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक,शिक्षक समन्वय होणे खूप गरजेचे असते. यासाठी सह्याद्री पब्लिक स्कूल येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शाळेचे आदरणीय भागवत इंगळे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक संतराम कराड याची उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामकिशन मस्के, शाळेचे कोष्यधक्ष रेणुका इंगळे शाळेच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, शालेय समितीच्या अध्यक्षा चाटे, व उपाध्यक्ष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या पालक मेळाव्याचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका छाया जाधव यांनी केले. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेचे सखोल मार्गदर्शन दोडके यांनी केले.तर विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनण्यासाठी पालकांची भुमिका कशी असावी याबद्दल सखोल माहिती मुंडे जे. एस यांनी व्यक्त केली. शाळेचे सहशिक्षक गजानन कदम यांनी पालकांच्या समस्येचे विविध प्रकारचे उदाहरणे देऊन निरसन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कराड व मस्के यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष. इंगळे म्हणले की तुमच्या पाल्याचा विकास हा आमचा ध्यास आहे.अशा शब्दांत आपले मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली सोळंके यांनी तर आभार गायकवाड यांनी मानले.
या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेनं तर सांगता माहाराष्ट्र गीताने करण्यात आली.