Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मित्राच्या बायकोवर वाईट नजर, जबरदस्तीचाही केला प्रयत्न

बीड-मित्राच्या बायकोवरच वाईट नजर ठेवून सातत्याने तिची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिच्यावर जबरदस्ती

केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात काल (दि.५) रात्री १२ च्या सुमारास एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मित्रानेच मित्राच्या बायकोवर वाईट नजर ठेवून छेड काढल्याप्रकरणी ३५४ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल शिंदे (रा. राजे शहाजी कॉलनी, शिवाजी नगर) असे आरोपीचे नाव आहे. अमोल आणि त्याचा मित्र दोघेही बीडच्या नगरपालिकेतील नौकरीला आहेत. अमोल नगरपालिकेत लिपिक असून मागच्या काही दिवसांपासून तो मित्राच्या बायकोवर वाईट नजर ठेवून होता. त्याने तीन वर्षांपूर्वी पिडीतेसोबत एका कार्यक्रमात फोटो काढत असताना तिची छेड काढली होती. यावेळी पीडितेने घडलेला प्रकार उपस्थिती नातेवाईकांना सांगितल्यानंतर अमोलने सर्वाची माफी मागून असा प्रकार पुन्हा घडणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणात तीन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र २६ जून रोजी पीडिता आपल्या मुलाला शाळेतून घेऊन येत असताना भाजी मंडईत अमोलने तिला अडवून 'मला तू खूप आवडतेस, मला तुला बोलायचे आहे म्हणत' अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडीतेचे काही फोटो अमोलने दाखवित 'तिला' ब्लेकमेल करण्याचा प्रयत्न केला व तू मला बोलली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन अशीही धमकी दिली. यावेळी पीडितेने नकार देत तेथून पळ काढला होता. मात्र ५ जुलै रोजी पुन्हा पीडिता आपल्या मुलाला शाळेतून घेऊन जात असताना भाजी मंडईमध्ये अमोलने तिला अडवून हाताला पकडल जवळ ओढले व तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेने भाजी मंडईतच जोराने आरडाओरड केल्यानंतर अमोल शिंदे येथून पळून गेला. रात्री उशिरा याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Saturday 6th of July 2024 12:10 PM

Advertisement

Advertisement