सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' योगेश्वरी महाविद्यालय क्लबचे प्रशिक्षण आणि ओरिएंटेशन.
अंबाजोगाई- योगेश्वरी महाविद्यालयाचे सायबर सुरक्षा क्लबचे प्रशिक्षण आणि ओरिएंटेशन विमान नगर पुणे येथे क्विक हिल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी दहा ते पाच पर्यंत पार पडला या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अजय शिर्के ,सुगंधा दाणी, गायत्री केसकर यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या विद्यार्थ्यांमध्ये आदर्श डोंगरे (प्रेसिडेंट), साक्षी चौधरी (सेक्रेटरी), श्रावणी कुलकर्णी (ऍक्टिव्हिटी डिरेक्टर)आणि प्रगती थावरे (पीआर /मीडिया डिरेक्टर) यांचा समावेश आहे.
तसेच या अभियानासाठी शिक्षक समन्वयक डॉ. आर जी जोशी यांची निवड करण्यात आली आहे हे सर्व निवड झालेले विद्यार्थी क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा या विषयावर जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक घटकांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांच्या सायबर विषयी माहिती व जागृती करून गुन्हे घडल्यास त्यावरील उपाय कसे करावे यासंदर्भात कार्य करणार आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.
व्ही.कानेटकर व उपप्राचार्य डॉ. आर .व्ही. कुलकर्णी यांनी अभियानासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे हे दुसरे वर्ष आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायबर जागरूकता अभियान राबवले आहे.