Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान पिकासाठी नियोजनाबाबत मार्गदर्शन

 बीड- खरीप हंगामातील आढळून येणारे पावसाचे दीर्घकालीन खंड किंवा अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पीक उत्पादनात घट येते. अशावेळी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणे तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पीक वाढीसाठी अनुकूल गादी वाफे, रुंद वरंबा बी.बी एफ तयार करणे आणि त्यावर पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरते. रुंद वरंबा सरी पद्धत (बीबीएफ) पिकांची जोमदार उगवण, एकाच वेळी वाफे तयार करणे, पेरणी करणे, खत देणे आणि विशेष म्हणजे कमी पाऊस किंवा अधिक पावसाच्या परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरते.

     रुंद वरंबा सरी पध्दती सोयाबीन पेरणी वरंब्यावर करण्यात येते. दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते व कमी पर्जन्यमान या स-यामध्ये पावसाचे पाणी साठवून जमीनीत मुरते त्यामुळे जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो. तसेच पाउस जास्त पडला तर या स-यांमधून पाण्याचा निचरा होतो,  आपण सोयाबीन पिकाचा विचार केला तर सोयाबिन पिकास पाण्याचा ताण बसला तर उत्पादनात घट दिसून येते. तसेच पाऊस जास्त झाला तर भारी जमिनीत पाणी साचून पिकांचे नुकसान होते. त्यामळे सोयाबीनसाठी रुंद वरंबा व सरी पध्दती जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

 बीबीएफ पध्दतीचे फायदे

पावसाचे पाणी स-यामध्ये मुरते त्यामुळे मूलस्थानी जल संवर्धन होऊन पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो. या पद्धतीमुळे चांगली मशागत होऊन बियाणांसाठी चांगले वंरबे तयार होतात. गादी वाफे किंवा दरम्यान मध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. बियाण्यांची उगवण चांगली होते व पिकांची पुढील वाढ जोमदारपणे होते.अधिक पाऊस झाल्यास अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास रुंद वंरबे सोबतच दोन्ही बाजूकडील सऱ्या मुळे मदत होते.  बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदीचे वंरबे दोन्ही बाजूने सऱ्यासह तयार करण. पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात. मजुरांची तसेच ऊर्जेची जवळजवळ 40 ते 60 टक्के बचत होते. परिस्थितीनुसार सरासरी पाच ते सात हेक्टर क्षेत्र प्रतिदिन पेरणी करता येते.

पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सरासरी 20 ते 25 टक्के पर्यंत अधिक जलसंधारण आणि 20 ते 25 टक्के पर्याय उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत करणे असे शक्य होते तसेच तन नियंत्रणाच्या दृष्टीने उगवण पूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तणनियंत्रण होते. सोयाबीन तसेच कपाशी, तूर, हळद इत्यादी पिकांची लागवड या पद्धतीने करता येते.

बीबीएस  यंत्राच्या साह्याने लागवड पद्धत

       योग्य खोलीवर व प्रमाणामध्ये बियाणांची खतासह रुंद वंरबा सरी पद्धतीने विविध पिकांची पेरणी करण्यासाठी बी एफ यंत्र विकसित केले आहे. याशिवाय कपाशी, तूर, हळद, आले या पिकांची लागवड या पद्धतीने करता येते. रब्बी हंगामात भुईमुग व हरभरा लागवड या यंत्राने करता येते. बीबीएफ यंत्राच्या साह्याने पिकानुसार योग्य रुंदीचे व वंरबे तयार करून जास्त अंतरावरील पिकांच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकांच्या चार ओळी रुंद व वंरब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्यावर लागवड करता येते. सपाट वाफे पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबासरी पद्धतीमुळे सोयाबीन उगवण दोन दिवस अगोदर तसेच जोमदार झाल्याचे प्रयोगाने सिद्ध झाले आह. या यंत्राद्वारे रुंद वरंबा बनवणे, बियाणे पेरणी, खते देणे, रासनी करणे आणि उगवण पूर्व तणनाशकाची फवारणी करणे. अशी चार कामे एकाच वेळी होतात. यंत्रामुळे मजूर, वेळ आणि इंधनाची बचत होते. बियाणे, रासायनिक खते अशी निविष्ठामध्ये 20 टक्क्यापर्यंत बचत होते.याशिवाय दुसऱ्या टप्प्यात सऱ्या मोकळ्या करणे, कोळपणी करणे, कीटकनाशकांची फवारणी करणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात.

Tuesday 11th of June 2024 06:51 PM

Advertisement

Advertisement