श्रीमद् भागवतकथा व भव्य कीर्तन महोत्सवाचे परळीत आयोजन
परळी -21 व्या शतकातील महान संत प.पू.गुरूवर्य श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त आडत व्यापारी, खरेदीदार व्यापारी व अ.भा.वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या संयुकत विद्यमाने शनिवार दिनांक 15 जुन ते 21 जुन रोजी परळी वैजनाथ येथील मोंढा येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 15 जुन पासून परळी वैजनाथ येथे ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवतकथा व कीर्तन महोत्सवाचे परळीत आयोजन करण्यात आले असून दैनंदिन कार्यक्रम पहाटे 5 ते 7 वा. सुंदरकांड, 12 ते 2 वा. महिला भजनी मंडळ व दुपारी 3 ते 6 वा. भागवत कथा होणार असून सायंकाळी 7 ते 9 वा. हरिकीर्तन होणार आहे. कन्हैय्या अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे हे आपल्या रसाळ व ओजस्वी वाणीतून कथा श्रवण करणार आहेत. त्यांना जनक ह.भ.प. जनक महााज कदम, ह.भ.प.राजेभाऊ महाराज आंधळे, ह.भ.प.रूक्षराज महाराज आंधळे, ह.भ.प.मोहन मुंडे, ह.भ.प.ऋषीकेश होळंबे हे कथा साथ संगत देणार असून ह.भ.प.अशेाक महाराज कराळे, ह.भ.प.करणकुमार मुंडे, ह.भ.प.माधव महाराज उखळीकर हे तबला साथ देणार आहेत.
शनिवार दिनांक 15 जुन पासून दररोज रात्री 7 ते 9 वा. विनोदाचार्य ह.भ.प.माणिक महाराज रेंगे, रविवार दिनांक 16 जुन रोजी विनोद सम्राट ह.भ.प.प्रकाश महाराज साठे, सोमवार दिनांक 17 जुन रोजी भागवताचार्य ह.भ.प.नामदेव महााज फपाळ, मंगळवार दिनांक 18 जुन रोजी बालकीर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे संगमकर, बुधवार दिनांक 19 जुन रोजी ह.भ.प.गणेशानंदजी महाराज शास्त्री भगवतीकर, गुरूवार दिनांक 20 जुन रोजी विनोदाचार्य ह.भ.प.भरत महाराज जोगी यांचे हरिकीर्तन होईल. तसेच 21 जुन रोजी ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री यांचे सकाळी 11 ते 1 वा.काल्याचे किर्तन होणार असून तद्नंतर लगेच कृ.उ.बा.स.सभापती सुर्यभान नाना मुंडे यांच्या वतीने महाप्रसाद होईल कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
दररोज दुपारी 12 ते 2 वा. जनाई महिला मंडळ टोकवाडी, हनुमान महिला भजनी मंडळ शिवाजीनगर, हनुमान महिला भजनी मंडळ थर्मल कॉलनी, शंभु महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळ, महारूद्र महिला भजनी मंडळ,शंभो महादेव महिला भजनी मंडळ, जलालपुर, वैद्यनाथ सेवाभावी भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, सुर्वेश्वर महिला भजनी मंडळ, हनुमान सेवा महिला भजनी मंडळ, गजानन महिला भजनी मंडळ, इच्छापुर्ती हनुमान महिला भजनी मंडळ, हरिहर महिला भजनी मंडळ, कल्याणकारी महिला भजनी मंडळ, शिवकन्या महिला भजनी मंडळ, स्वरांजली महिला भजनी मंडळ, माऊली महिला भजनी मंडळ संगम, जगमित्र नागा महिला भजनी मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, माधवाश्रम महिला भजनी मंडळ, मन्मथस्वामी महिला भजनी मंडळ, तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ, गुरूलिंग स्वामी महिला भजनी मंडळ, कालीका महिला भजनी मंडळ, जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ, भगवानबाबा महिला भजनी मंडळ, दक्षिणमुखी हनुमान महिला भजनी मंडळ, वडसावित्री महिला भजनी मंडळ, गिताई महिला भजनी मंडळ सहभाग घेणार आहेत.
कार्यक्रमात गायनाचार्य म्हणून ह.भ.प.राजेभाऊ महाराज मुंडे, ह.भ.प.मुरलीअण्णा डाबीकर, ह.भ.प.रानबा महाराज फड, ह.भ.प.दत्ता महाराज गडदे, ह.भ.प.राजेभाऊ महाराज आंधळे, ह.भ.प.रूक्षराज महाराज आंधळे, ह.भ.प.मोहन महाराज मुंडे, ह.भ.प.बबबन महाराज गिराम, ह.भ.प.सुरेश महाराज मोगरे, ह.भ.प.विष्णु महाराज वाघमारे, ह.भ.प.माऊली महाराज कतारे, ह.भ.प.सुभाष महाराज चाटे, ह.भ.प.मनोहर महाराज चाटे, ह.भ.प.श्रीहरी महाराज मुंडे तर चोपदार म्हणून ह.भ.प.मुरलीधर लोकरवाडीकर, ह.भ.प.लिंबाजी महाराज गुट्टे, विणेकरी म्हणून ह.भ.प.सोपान महाराज गित्ते तर काकडा भजन ह.भ.प.प्रभु महाराज फड, ह.भ.प.सत्यनारायण मुरकुटे, ह.भ.प.शंभुदेव महाराज केंदे्र, तर वारकरी महिला मंडळ-सौ.सुरेखाताई मेनकुदळे, श्रीमती प्रणिताताई धर्माधिकारी, सौ.शोभाताई चाटे, सौ.राधिकाताई जायभाये, सौ.सुमनताई देशमुख, सौ.चेतनाताई गौरशेटे, सौ.रमाताई आल्दे, सौ.स्वातीताई ताटे, सौ.संगिताताई टाक हे आपली सेवा सादर करणार आहेत.
परळी शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवतकथा व कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे मार्गदर्शक तथा अ.भा.वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, आडत व्यापारी व खरेदीदार व्यापारी मोंढा परळी वैजनाथ यांनी केले आहे.
