जोतीबाची काठी - पताका मिरवणूक उत्साहात
केज - केज तालुक्यातील देवगांव येथे जोतिबा मंदिर परिसरात जोतीबाची काठी - पताका मिरवणूक वाजत - गाजत मोठ्या उत्साहाने काढण्यात आली. मिरवणुकीत लेझीम व झांज पथकाने लक्ष वेधले. तर शोभेची दारू उडविण्यात आली.
केज तालुक्यातील देवगांव काटेशेवर शेत परिसरात कुलदैवत जोतीबाचे मंदिर असून अक्षय्य तृतीयाचे औचित्य साधून शुक्रवारी जोतीबाची काठी - पताका मिरवणुक ही मंदिरापासून गावापर्यंत वाजत - गाजत काढण्यात आली. या मिरवणूकीत लेझीम व झांज पथकाने लक्ष वेधून घेतले. तर शोभेची दारू ही उडविण्यात आली. त्यानंतर मंदिरात महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. मिरवणुकीत व कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच अतुल मुंडे, उपसरपंच सुभाष मुंडे, ग्रा. प. सदस्य ज्ञानेश्वर मुरकुटे, नानासाहेब मुंडे, गणेश मुंडे, पांडुरंग मुंडे, रामराव मुंडे, संतोष मुंडे, धनजंय मुंडे, लखन मुंडे, सखाहारी मुंडे, बाबासाहेब नागरगोजे, लिंबराज मुंडे, तात्यासाहेब मुंडे, विलास मुंडे, प्रभाकर मुंडे, लक्ष्मण मुंडे, विकास मुंडे, बालाजी मुंडे यांनी परिश्रम घेतले.