रोटरी क्लबच्या वतीने मतदारांना वृक्षांचे वाटप
अंबाजोगाई - शहरात वृक्ष चळवळ जोपासली जावी. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सोमवारी दिवसभर श्री.खोलेश्वर विद्यालया समोर रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने ४०० विविध प्रकारच्या रोपट्याचे वाटप मतदान करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना वाटप करण्यात आले.
अंबाजोगाई शहरातील या वर्षी नवीन १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी च्या वतीने करण्यात आला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभर खोलेश्वर विद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर हा उपक्रम राबविला. शहरातील ४०० कुटुंबांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनाही वृक्षरोप भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी,सचिव गणेश राऊत, कल्याण काळे, धनराज सोळंकी,डॉ.बालासाहेब लोमटे, प्रा.संतोष मोहिते,प्रदीप झरकर,
अँड अनिल लोमटे, यांच्यासह रोटरी चे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.