Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीड जिल्ह्यात सुमारे ६८ टक्के मतदान

बीड - बीड लोकसभा मतदार  मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता  मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत प्राथमिक उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

या यामध्ये आष्टी 69%, बीड62%, गेवराई 65%, केज 68%., माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. 

बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 15 आदर्श मतदान केंद्र होते.  

यामध्ये 288-गेवराई 2, 239-माजलगाव -2, 230- बीड -2 231-आष्टी -5, 232-केज -4 व 233 परळी -1 हे होते.

दिव्यांग, महिला, नव मतदार, तृतीयपंथी  सर्वांनी उत्साहपूर्णपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र होते, 55 महिला मतदान केंद्र, 316 परदानशी केंद्र होती.

Monday 13th of May 2024 08:19 PM

Advertisement

Advertisement