Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वाहनाला अपघात, अर्जुन महाराज लाड बचावले

केज  - केज - अंबाजोगाई रस्त्यावर चंदनसावरगाव जवळ केज तालुक्यातील कीर्तनकार अर्जुन महाराज लाड यांच्या गाडीस अपघात होऊन त्याची चारचाकी पलटी झाली. सुदैवाने महाराजांना कसल्याही प्रकारची इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.


     केज तालुक्यातील कीर्तनकार अर्जुन महाराज लाड हे शनिवारी दुपारी केज ते अंबाजोगाई रस्त्यावरून जात असताना चंदनसावरगाव जवळ त्यांच्या चारचाकी वाहनास अपघात होऊन त्यांची गाडी पलटी होऊन गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने अर्जुन महाराज लाड यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. 

Saturday 11th of May 2024 09:27 PM

Advertisement

Advertisement