प्रा. हजारे यांची मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी पद्दोनती
अंबाजोगाई/प्रतिनिधी: तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी सेवाजेष्ठतेने प्रा. निळकंठ कल्याणराव हजारे यांची पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पुर्वीचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सेवानिवृत्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदावर सेवाजेष्ठतेने प्रा. निळकंठ हजारे यांची 1 फेब्रुवारी 2024 पासून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकरी नागनाथ शिंदे यांनी 1 एप्रिल 2024 रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार संस्थेच सचिव प्रा. जयजित शिंदे यांनी प्रा. हजारे यांना मंगळवारी (दि. 2) रितसर मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदाचा पदभार दिला. पदभार स्विकारल्यानंतर कर्मचाऱ्यांशी बोलतांना मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रा. हजारे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यांन शाळेची प्रगती करण्याचे आश्वासन संस्था पदाधिकाऱ्यांना दिले. निवड झाल्याबद्दल प्रा. हजारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.