अंबाजोगाई येथे माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई यांच्या वतीने रोजा इफ्तार व स्नेह भोजनास कार्यक्रमास मुस्लिम धर्मियांची उपस्थिती
अंबाजोगाई - अंबाजोगाई शहरातील समाजसेवक तसेच माजी उपनगराध्यक्ष व शिक्षण क्षेत्रातील मातब्बर व्यक्तिमत्व शेख रहीम भाई यांच्या वतीने मुस्लिम बांधव व इतर धर्मियांसाठी रमजान महिन्याच्या निमित्ताने रोजा इफ्तार व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या अनेक वर्षापासून शेख रहीम भाई हे मौलाली पहाड या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या दर्गाह परिसरात इफ्तार पार्टी व स्नेह भोजनाचे आयोजन करतात. शेख रहीमभाई हे संवेदनशील व्यक्तिमत्व असून अंबाजोगाई शहराच्या शांततेत आणि सलोख्यात त्यांचे मोठे योगदान आहे.सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे कधीही अंबाजोगाईत हिंदू- मुस्लिम दंगल किंवा चुकीची घटना घडलेली नाही. शिवाय मुस्लिम समाज हा शैक्षणिक दृष्ट्या सुधारला पाहिजे यासाठी उर्दू प्राथमिक, उर्दू माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय त्यांनी अंबाजोगाई शहरांमध्ये सुरू केले. मुस्लिम समाजातील मुली या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या पाहिजेत यासाठी त्यांनी कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंतचे महाविद्यालय या ठिकाणी सुरू केले. शेख रहीम भाई यांच्या वतीने शनिवार दि. 30 मार्च रोजी मौलाली पहाड या ठिकाणी मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्ताने ,रोजा इफ्तार पार्टी व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमास केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिताताई अक्षय मुंदडा,ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,युवा नेते अक्षय मुंदडा, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, दिनेश भैय्या परदेशी,भाजपनेते गणेश कराड,युवा नेते कृष्णा लोमटे, सचिन केंद्रे, सचिन वाघमारे,माणिकराव बावणे, सुखदेव भुंबे, असेफुद्दीन बाबा खतीब यांच्यासह हजारो मुस्लिम बांधव व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर त्याच ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी नमाज अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली.उपस्थितांचे स्वागत आयोजक शेख रहीमभाई, शेख इर्शादभाई,मतीन बागवान,शय्युब कुरेशी, शेख उमर फारूक सर,शेख मुजाहिद सर, सय्यद रौफ यांच्यासह अलखैर परिवार व उर्दू माध्यमातील सर्व विद्यालयांच्या वतीने करण्यात आले.