Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

तलवाड्यात तरूणाला ट्रकने उडविले

गेवराई - भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वाराला उडविल्याने झालेल्या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास तलवाड्यातील एकमिनार मस्जीदसमोर घडली. अपघातानतर पळुन जाणाऱ्या ट्रक चालकाला जमावाने पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बम्गेवाडी येथील इनूस शेख (वय ३२) हे दुपारची नमाज अदा करून मोटारसायकलवर गावाकडे निघाले असता समोरून येणाऱ्या १२ टायर ट्रक क्र.एम.एच. २३.डब्ल्यु. ९४०० ने शेख यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात शेख यांचा जागीच मृत्यु झाला. रोजा असलेल्या शेख यांच्या अपघाती मृत्यूनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच सपोनि सोमनाथ नरके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रक चालक मद्यप्राशन केलेला होती अशी माहिती समोर आलेली आहे

Tuesday 2nd of April 2024 04:48 PM

Advertisement

Advertisement