बीड जिल्ह्यात विजेचे तीन बळी
बीड - मागील दोन-तीन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसात वीज पडून जिल्ह्यात
तिघा जणांचा मृत्यू झाला. अवकाळी पावसाने आंब्यासह इतर फळपिकांचे देखील नुकसान झाले.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर विभागात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला.
या अवकाळी पावसात वीज पडून जिल्ह्यात तिघा जणांचा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यात शुक्रवारी दोन तर शनिवारी गेवराई तालुक्यात वीज पडून एक जण दगावला. वीज पडल्याने हनुमंतगाव ता. आष्टी येथील शांताबाई बापुराव खेमगर (वय 65) यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला तर ओटी तालुक्यातीलच रुईनालकोल येथे वीज पडल्याने आनंद सुरेश सोनवणे (वय 22) या ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाला तर शनिवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.