अंधारात कोरड्या विहीरीत पडून शेतकरी ठार
माजलगाव - शेतातील गोठ्यात जनावरे असल्याने रक्षणासाठी रात्री शेतकरी जागली वर आला. परंतु अंधार असल्याने अंदाज न आल्याने कोरड्या विहिरीत पडून गंभीर जखमी होऊन शेतकरी ठार झाल्याची घटना उमरी (ता.माजलगाव) येथे रात्री घडली आहे.
सिद्धेश्वर सखाराम घायतिडक (वय 55 वर्ष) रा. उमरी (ता.माजलगाव) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. सध्या जनावरांच्या चोरीच्या घटना घडत असल्याने जनावरांच्या संरक्षणासाठी सिध्देश्वर घायतिकडक रात्री शेतात जागलीवर (गोठा) जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. परंतु रस्त्यातील विहीरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्याअंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले असतील, विहीर कोरडी असल्याने खडकावर आपटून मार लागल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु याप्रकरणी पोलीस तपासात निष्पन्न होईल, या घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.