Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

झी अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्डच्या धर्तीवर रंगला बालझुंबड -२०२४ चा बक्षीस वितरण सोहळा

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने  सलग २४ व्या वर्षी आयोजित बालझुंबड-२०२४ चा बक्षीस वितरण सोहळा आज शुक्रवार दि ०९  रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला . हा बक्षीस वितरण सोहळा वृत्त वाहिन्यांच्या  फिल्मफेअर अवॉर्ड, झी अवॉर्ड  सोहळ्याच्या धर्तीवरच  संपन्न करण्यात आला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .या सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. 

            कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे सचिव दिनकर जोशी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी  राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला २४ वर्ष पूर्ण होऊन  रौप्य  महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करत असल्याचे अभिमानाने सांगितले.अंबाजोगाई शहराची सांस्कृतिक परंपरा बालझुंबड या उपक्रमाद्वारे जोपासण्याचे काम हे मंडळ करत आल्याचे उल्लेखित केले. तसेच संस्कृती म्हणजेच अंबाजोगाई शहर अशी ओळख निर्माण झाल्याचे देखील याप्रसंगी दिनकर जोशी यांनी आवर्जून सांगितले. या स्पर्धेत इयत्ता १ली ते ४ थि, ५ वी ते ७ वी , तसेच ८ वी ते १० वी असे तीन गट तयार करण्यात आले होते.ज्यामध्ये पीपीटीस्पर्धेत ५ वी ते ७ वी या गटातून चि. रणवीर चंद्रकांत देशमुख,चि. शेख हसन खुर्शीद,छ संभाजीराजे ग्लोबल स्कुलच्या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळवला , त्याचबरोबर श्रीमती गोदावरी कुंकुलोळ शाळेच्या कु. समीक्षा गायकवाड व कु.गाथा मुळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय तर  पुन्हा छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कुलच्याच कु. मोलीना चव्हाण या विद्यार्थिनीनी तृतीय क्रमांक मिळवत आपल्या शाळेस सन्मान मिळवून दिला.त्याचबरोबर इयत्ता  इयत्ता ८ वी ते १० वी गटातून न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या कु सई अर्जुन पवार व कु. वांशिका रविंद्र अहिरे या विद्यार्थ्यांनी पहिला येण्याचा मान मिळवला. छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कुलचे चि प्रणव धर्मराज जाधव आणि चि आरुष संतोष परदेशी या विद्यार्थ्यांनी दुसरा नंबर मिळवला तसेच खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे चि. तन्मय भैरुनाथ सातपुते, चि. कार्तिक राजेश गोरे या विद्यार्थ्यांनी तृतीय नंबर पटकावत आपल्या शाळेस बहुमान मिळवण्यासाठी प्रयत्न केला.

          क्विझ कॉम्पिटीशन स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १० वी गटातून प्रथम क्रमांक चि. सार्थक वैजनाथ अंबाड , व्दितीय क्रमांक  आनंद अमोल विभूते, तसेच  तृतीय क्रमांक कु. मयुरी नवनाथ मोरे व चि. आदित्य अंगद देशमुख  या विद्यार्थ्यांनी मिळवला. तर इयत्ता ५ वी ते ७ वी गटातून  चि. ईशान राजेंद्र वडखेलकर, तर द्वितीय श्रेणीत चि.आराध्य गोपाळ गडदे, तर तृतीय क्रमांकासाठी चि. वरद विवेक देशमुख या विद्यार्थ्यांनी आपले नाव पटकावले .

              वैयक्तिक नृत्य स्पर्धेत इयत्ता  १ ली ते ४ ठी गटातून न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचा विद्यार्थी चि. वरद महेश सूर्यवंशी याने पहिला क्रमांक पटकावला तर , कु. भाग्यश्री बाळू गिरी हीने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर  तृतीय क्रमांक खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाची कु. श्रीमयी शंकर शिनगारे या विद्यार्थिनीने आपल्या शाळेचे नाव कमावले. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वी गटातून प्रथम क्रमांक चि. रणवीर चंद्रकांत देशमुख छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कुल , द्वितीय संस्कृती संतोष घाडगे तर तृतीय क्रमांक अंशुल गिरीश बिडवे या विद्यार्थ्यांनी मिळवला. इयत्ता ८वी ते १०वी गटातून प्रथम क्रमांक कु. समृद्धी संजीव चाटे, देवयानी सुदर्शन देशमुख द्वितीय तर कु. राधिका गणेश चव्हाण या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवत आपले व आपल्या शाळेचे नाव उज्वल केले.

           रंगभरण स्पर्धेत १ ते ४ गटातून कु. श्रावणी दीपक फड,श्रेया श्रीनिवास शितोळे या विद्यार्थ्यांनी आपले व आपल्या शाळेचे नाव चमकवले. इयत्ता ५ वी ते ७ वी गटातुन कु. भूमी चंद्रकांत कोकाटे , ८वी ते १० वी या गटातून चि चैतन्य नितीन पवार या विद्यार्थ्यांनी बक्षीस संपादन केले .

            समूह नृत्य स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी गटातून प्रथम क्रमांक प्रमोदजी महाजन इंग्लिश स्कुल  , द्वितीय क्रमांक सृजन प्राथमिक विद्यालय, तर तृतीय क्रमांक घटनागनाथ प्राथमिक विद्यालय या शाळेतील मुलांच्या समूहाने मिळवला . ५ वी ते ७ वी या गटातून प्रथम क्रमांक प्रमोदजी महाजन इंग्लिश स्कुल , द्वितीय क्रमांक न्यू व्हिजन पब्लिक स्कुल, तृतीय क्रमांक स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिर स्कुलच्या  समूहाने समूह नृत्य स्पर्धेत आपल्या शाळेचे नाव उज्वल केले . मानवविकास मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विशेष नृत्याचा विशेष गौरव करण्यात आला. तर इयत्ता ८ वी ते १० वी गटातून प्रथम क्रमांक प्रमोदजी महाजन इंग्लिश स्कुल, द्वितीय क्रमांक श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोल योगेश्वरी नूतन कन्या शाळा, तृतीय क्रमांकासाठी वसंतराव काळे पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपले प्राविण्य दाखविले. या बक्षीस वितरण समारोहात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, विलास सोनवणे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, किशोर परदेशी, तानाजी देशमुख, प्रवीण जायभाय, माजी नगरसेवक महादेव आदमाणे, अमोल लोमटे, संतोष शिनगारे, धम्मा सरवदे, गोविंद पोतंगले , खयामोद्दीन काझी, रोटरीचे स्वप्नील परदेशी, गणेश राऊत, मोईन शेख, इनर्व्हीलच्या सुनीता कात्रेला, श्रीमती खंडाळे  रूपेश चव्हाण, सुधाकर  टेकाळे , जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, प्रशांत बर्दापूरकर, दत्ता आंबेकर, रवी मठपती, दिलीप आरसुळ,  अभिजित लोमटे, राहुल देशपांडे यांच्यासह डॉ. राहुल धाकडे, डॉ.राजेश इंगोले, डॉ. अपर्णा कुलकर्णी , डॉ. बळीराम मुंडे, डॉ.संदीप मोरे, डॉ.जुबेर शेख, डॉ.विजय लाड,  डॉ. ऐश्वर्या चव्हाण त्याचबरोबर अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अशोक कवडे, ऍड.कल्याणी विर्धे ,ऍड.अनिल लोमटे, ऍड.सुनील पन्हाळे , व्यापारी रामानुज मुंदडा, सुभाष बाहेती, धनराज सोळंकी, कांतीलाल चोकडा, तसेच पांडुरंग नरवडे, विष्णू सरवदे, दत्ता देवकते, साधू गायकवाड, यांच्यासह प्रतिष्टित नागरिक मकरंद कुलकर्णी,सुनील वाघाळकर, बाळासाहेब माने, गजानन औसेकर, योगेश कुलकर्णी , सय्येद ताहेर, अजीम जरगर आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश कांबळे यांनी केले. बालझुंबड -  २०२४ संपन्न करण्यासाठी समन्वयक राजेश कांबळे,  मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड, आनंद टाकळकर, विनायक मुंजे, सचिन जाधव, विशाल जगताप आदींनी परिश्रम घेतले.यावेळी अंबाजोगाई तालुक्यातील विविध शाळांतील अनेक गुणवंत विद्यार्थी  पालक ,शिक्षक व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 10th of February 2024 04:27 PM

Advertisement

Advertisement