धनगर समाजाच्या आरक्षणाला रमेश आडसकर यांचा पाठींबा
बीड - धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यासाठी विविध माध्यमांतून आंदोलने होत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला पाठींबा असल्याची भाजपचे माजलगाव मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर यांनी म्हटले आहे.
धनगर समाजाला अनुसुचत जातीतून आरक्षण देण्याबाबतची शिफारस कें्रद सरकारकडे करावी व आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत सकल धनगर समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आपण पूर्वीपासून या मागणीला पाठींबा दिल्याचे रमेशराव आडसकर म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी नुकतेच आंदोलन झाले असून सरकार आरक्षण देणारच असल्याचे रमेशराव आडसकर म्हणाले. आता धनगर समाजाला देखील सरकारने तत्काळ आरक्षण देण्याची मागणी होत आहे. सरकार देखील या मागणीबाबत सकारात्मक पावले उचलत असल्याचे भाजपचे माजलगाव मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देण्यच्या मागणीला आपला पाठींबा असल्याचे श्री. आडसकर यांनी नमूद केले. या मागणीवर आपण कायम धनगर समाजासोबत खांद्याला खांदा लाऊन असल्याचेही रमेशराव आडसकर म्हणाले.