आठ कोटी रूपये खर्च करूनही पुस वीसखेडीचे ग्रहण सुटेना
दिड महिन्यापासुन विजेअभावी बंद होती योजना; जिल्हा परिषदेकडे योजना चालविण्यासाठी मनुष्यबळच नाही
अंबाजोगाई -अंबाजोगाई व परळी तालुक्यातील 100 गावांना दुष्काळी काळात पाणी पुरवठा केलेली योजना डबघाईला आल्यामुळे तत्कालीन सरकारने योजना पुनर्जीवण करण्यासाठी 7 कोटी 88 लाख रूपयांचा निधी मंजुर केला.
या निधीतून योजना पुन्हा नव्याने उभा टाकली. पुनर्जीवणाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असल्यामुळे त्यांनी संपुर्ण यंत्र सामुग्रीसहीत योजना नवी केली व ती प्रायोगीकत्वावर चालविली देखील परंतु यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही योजना जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केली. 28 जून रोजी या योजनेवर 98 लाख रूपयांचे विज बिल असल्यामुळे विज पुरवठा खंडीत केला. पुनरूज्जीवणाच्या तरतुदीमध्येच वीज बिलाचा समावेश असल्यामुळे त्याची रक्कम 15 जुलै रोजी मंजुर झाली. या मंजुरीच्या पत्रावर विज पुरवठा सुरू झाला. परंतु आता जिल्हा परिषदेकडे योजना चालविण्यासाठी मनुष्य बळ नसल्यामुळे ही योजना बंद पडलेली आहे. 8 कोटी रूपये खर्च करून देखील गृहण सुटेनासे झाले आहे.
अंबाजोगाई व परळी तालुक्यासाठी दुष्काळाच्या काळामध्ये पुस वीसखेडी योजनेने अंदाजे 125 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. ही योजना दोन्ही तालुक्यासाठी महत्वपुर्ण ठरली. सदरील योजना विज वर्षापुर्वीची जुनी असल्यामुळे यंत्रसामुग्री, पाईप लाईन नादुरूस्त झाल्या होत्या. या योजनेला पुनरूज्जीवण करण्याठी तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून योजनेला सात कोठी 88 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला. या निधीतून अंबलवाडी उद्भवण केंद्रातील 200 एच.पी.च्या मोटारी, पुस जलशुद्धीकरण केंद्रावरील 50 एच.पी.च्या दोन मोटारी व पाईप लाईन नादुरूस्त असलेल्या ठिकाणी नविन टाकणे या निधीमध्ये तरतुद होती. जिल्हा परिषदेकडे पुनरूज्जीवण करण्यासाठी तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले. पुनरूज्जीवणाच्या निविदेमध्ये या योजनेची सर्व यंत्र सामुग्री नवी टाकणे पाईपलाईन दुरूस्त करणे आवश्यकत्या ठिकाणी नवी टाकणे पुस वीसखेडी जलशुद्धीकरण केंद्राला संरक्षण वायर करणे आदी तरतुद होती योजना पुर्ण झाल्यानंतर ही योजना प्रायोगिक तत्वावर एक वर्ष चालविणे एम.जी.पी.ला बंधनकारक होते. ते एक वर्ष चालविले परंतु मध्यंतरी कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पुन्हा एक वर्ष योजना चालविण्याच्या सुचना शासनाकडून मिळाल्या. आणि दोन्ही त्यांनी ही योजना यशस्वीपणे चालविली. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणणे ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्यानंतर महावितरणचे 98 लाख रूपयांचे विजबिल थकल्यामुळे महावितरणणे 28 जून रोजी विज पुरवठा खंडीत केला. या विसखेडी योजनेवर अवलंबून असलेल्या दहा गावातील नागरिकांची ओरड होवू लागल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाठ यांनी शासन स्तरावर पाठपुराव करून विजबिल व पुनरूज्जीवनाच्या कंत्राटदाराचे मिळून रक्कम मंजुर 1 कोटी 6 लाख 13 हजार रूपये शासनाच्या पाणी पुरवठा विभागाकडून 15 जुलै रोजी मंजुर करून आणले. मंजुर निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग झाल्यानंतर महावितरणला देण्यात येणार आहे. या मंजुरी पत्राअधारे महावितरणणे चार दिवसापुर्वी या योजनेचा विज पुरवठा पुर्ववत केला असला तरी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे योजना चालविण्यासाठी मनुष्य बळ नसल्यामुळे ही योजना धुळ खात पडली आहे. एकीकडे कोट्यावधी रूपये खर्च करून योजना पुनरूज्जीवित केली जाते. दुसरीकडे ती योजना चालविण्यासाठी मनुष्यबळ नाही हे कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तर जिल्हा परिषदेकडे आजही कामे नसल्यामुळे घर बसून पगार घेणारे कर्मचारी आजही मोकाट फिरत आहेत. जिल्हा परिषदेकडे कर्मचार्यांचा तुटवडा कसा समजावा हे कोडे न उलगडणारे आहे.
सध्या पावसाळ्या दिवस असल्यामुळे वीसखेडी योजनेवर अवलंबून असलेल्या दहा गावांना नदी नाल्यांचे दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. आठ कोटी रूपये खर्च करून देखील नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसेल तर ही प्रशासनासाठी ही लार्जीवाणी गोष्ट आहे.
पुस वीसखेडी योजना जिल्हा परिषदेने चालवावी
पुस वीसखेडी योजना पुनरूज्जीवीत करण्याचे काम आमच्या विभागाकडे सोपविण्यात आले होते. शासनाच्या निविदेप्रमाणे संपुर्ण काम केले आहे. काम पुर्ण झाल्यानंतर एक वर्ष प्रायोगिक तत्वावर चालविण्याची तरतुद होती. परंतु आम्ही ही योजना दोन वर्ष चालविली आहे. सध्या आमच्याकडे कर्मचार्यांचे मनुष्यबळ नसल्यामुळे ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आहे. ती चालविण्याचे काम जिल्हा परिषदेचे आहे.
- के.बी.चिवरे (कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बीड)
मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
जिल्हा परिषदेकडे पुस वीस खेडी योजना चालविण्यासाठी कर्मचार्यांची कमतरता आहे. जी योजना बंद आहे. तेथील कर्मचार्यांना या योजनेवर नियुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत असून कर्मचारी लवकरच उपलब्ध करून देवूत.
- शिवकन्या शिवाजी सिरसाठ (अध्यक्षा-जि.प.बीड)
