Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

परळीत चोरट्यांचा धुमाकूळ

परळी - शहरातील चोरी चे वाढत आहेत. दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी व परिसरात चोरीच्या घटना सुरूच आहेत.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे.
चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन काल चोरीची मोठी घटना विद्यानगर भागात घडली.तर आज जवळच्याच माधवबाग भागात चोरी झाली.या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्यानेलोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासूनबचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत.
दररोज चोरीच्या घटनांची नोंद होत आहे. दि.3 रोजी माधवबाग भागात फिर्यादी मुक्ता श्रीहरि सानप यांच्या घरी चोरी झाली आहे. घरात अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉक उघडुन कपाटातील 90 हजार रुपये लंपास केले.याप्रकरणी परळीत संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Friday 5th of August 2022 09:09 PM

Advertisement

Advertisement