Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

धुनकवड ते उपळीफाटा रस्त्याची झाली दुरवस्था

दहा वर्षांपासून रखडले काम; ग्रामस्थ झाले त्रस्त

धारूर -  तालुक्यातील धुनकवड ते उपळी फाटा रस्त्याची दुरवस्था झाली असून गेली दहा वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्ता अतिशय खराब झाला असून अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरून जाताना वाहनधारकास मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता नव्याने किंवा तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी धुनकवड ग्रामस्थांनी केली आहे. धारूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे.

त्यामध्ये धुनकवड ते उपळी फाटा रस्त्यात प्रवास करताना वाहन एका खड्ड्यात जाण्यापासून वाचवले तर दुसऱ्या खड्ड्यात जाते. या रस्त्याने दररोज अनेक लहान-मोठी वाहने ये जा करतात. धुनकवड, डोंगरेवस्ती, उपळी परिसरातील शेतकरी शेतमाल वडवणी, माजलगाव येथे विक्रीसाठी याच मार्गानि नेतात तसेच या रस्त्यालगत असलेली शेतकऱ्यांची मुले याच रस्त्याने शाळेत जातात. सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशीमागणी धुनकवड- उपळी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात मोठा त्रास होतो. रस्त्यावर पाणी जमा झाल्याने प्रवास करणे अवघड झाले आहे तरी या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Friday 5th of August 2022 09:07 PM

Advertisement

Advertisement