सासरा, सासू, मेहुण्याने दिला त्रास, जावयाने सासरवाडीतच घेतला गळफास
परळी - सासरा, सासू आणि मेहुण्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून जावयाने सासरवाडीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे उघडकीस आली.
कृष्णा बालासाहेब शेळके (वय ३०, रा. आचार्यटाकळी, ता. परळी) असे त्या मयत जावयाचे नाव आहे. कृष्णाचा विवाह कौडगाव घोडा येथील शीतल सोबत झाले असून त्यांना तीन अपत्ये आहेत. कृष्णा आणि शीतमध्ये नेहमीच घरगुती किरकोळ स्वरूपाचे वाद होते असत. शीतल ने याबाबत सांगितल्यानंतर तिचे वडील दिलीप दादाराव धुमाळ, आई सुनिता आणि भाऊ शिवाजी हे नेहमी कृष्णाला श्विगल करून मारहाण करत आणि जिये मारण्याची धमकी देत असत. त्यांच्या त्रासाला कंटाळलेला कृष्णा नेहमी आत्महत्या करण्याबाबत बोलत असे. परंतु आईने समजूत घालून त्याला रोखले होते. सोमवारी (दि.२०) शीतल माहेरी असताना तिच्या मुलगा आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कृष्णा कौडगाव घोडा येथे मुक्कामी गेला होता. तिथे मंगळवारी (दि.२१) सकळी त्याने सासरा, सासू आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून ढाब्याच्या स्वयंपाक खोलीत लोखंडी आडुला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद त्याची आई शोभाबाई बाळासाहेब शेळके यांनी दिली. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
