Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत विद्यार्थ्यांना दिला माणुसकीचा आधार

अमेरिकेत वास्तव्यास असणारे भारतीय नागरिक श्रीकांत सुरवसे यांनी मुलांच्या वाढदिवसा निमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चास फाटा देत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना  स्कूल बॅगचे केले वाटप . 

       अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा या गावचे मूळ रहिवासी व सध्या नोकरी निमित्ताने टेक्सास-अमेरिका या शहरात वास्तव्यास असणारे श्रीकांत अनुरथ सुरवसे यांच्या आदित्य व अथर्व या दोन्ही मुलांच्या वाढदिवसा निमित्त होणारा अनावश्‍यक खर्च टाळत  त्यांच्या मुलांचे वाढदिवस साध्या पद्धतीने घरीच साजरे करून वाढदिवसा निमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार स्कूल बॅग अमेरिकेत खरेदी करून "आधार माणुसकीचा "उपक्रमाच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक (बरडवस्ती) मधील शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी स्कूल बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आकर्षक स्कूल बॅग मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात होता.

      या प्रसंगी आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ऍड संतोष पवार ,मनोज इंगळे उपअभियंता मुंबई ,सौ वसुंधरा मनोज इंगळे,सौ सुदामती इंगळे, सौ मंगल पवार, सहशिशिका श्रीमती टेकाळे आदि उपस्थित होते. 

सामान्य कुटुंबातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतात त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पालक घेऊन देऊ शकत नसल्याने ,या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेण्यासाठी असंख्य अडथळे असतात, समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शक्य असेल त्या पद्धतीने शिक्षणासाठी मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करणाऱ्या "आधार माणुसकीचा " उपक्रमाचे प्रमुख ऍड संतोष पवार यांनी  केले.

Wednesday 22nd of June 2022 04:12 PM

Advertisement

Advertisement