Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता लाच स्वीकारताना जेरबंद

अंबाजोगाई - पूर्ण केलेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आज बुधवारी (दि.२२) अंबाजोगाईतील सा.बां. विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 

 संजयकुमार कोकणेची अंबाजोगाई येथील कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. पदभार स्वीकारताच त्याने कार्यालयात गुत्तेदार पिस्तुलचा धाक दाखवून बिलांवर सह्या घेतात, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन पिस्तुल परवान्याची मागणी केली होती. त्यानंतरही कंत्राटदारांची अडवणूक करणे, अरेरावीची भाषा करणे असे प्रकार समोर आले होते. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितली होती. याबाबत केदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून बीडच्या पथकाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यास रंगेहाथ पकडले. 

Wednesday 22nd of June 2022 04:05 PM

Advertisement

Advertisement