Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

योगेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी 23 जून रोजी राज्यपाल कोश्यारी अंबाजोगाईत

बीड - राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बीड जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून 23 जून रोजी मुंबईतून निघून दुपारी तीन वाजता लातूर येथे पोहचणार आहेत. लातूर येथून मोटारीने राज्यपाल अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहाला थांबल्यानंतर दुपारी चार वाजता अंबाजोगाई शहरातील योगेश्‍वरी देवीचे दर्शन घेऊन राज्यपाल परळीकडे जातील. परळीच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता परळी शहरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सव्वा दहाच्या दरम्यान ते लातूरकडे मोटारीने रवाना होतील. आघाडी सरकारच्या काळात पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बीड जिल्हा दौर्यावर येत असून राज्यपाल हे फक्त अंबाजोगाई येथील योगेश्‍वरी देवीचे दर्शन आणि परळीतील प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर कोणताही त्यांचा शासकीय कार्यक्रम नाही.

Tuesday 21st of June 2022 09:40 PM

Advertisement

Advertisement