Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पंकजा मुंडे यांनी आष्टीतुन फुंकले जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूकीचे रणशिंग

धस धोंडेनी केले ताईचे अभूतपूर्व स्वागत

आष्टी(प्रतिनिधी)-येणा-या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत बीडची जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात येणार आहे.त्याचे कारण असे की,मी ज्यावेळेस मी म्हणाले की जिल्ह्यात माफी राज आहे तर जिल्ह्याच्या पालकमंञ्यांना मिर्ची झुंबली.आरे तुम्ही जे कामांचे उद्याटन करतात ते माझ्याच कामाचे उद्याटन करत असून,मी या येणा-या निवडणूकीत या मतदार संघातून रणशिंग फुंकले आहे.त्यामुळे आता मी स्वत;लक्ष घालून हि निवडणूक लढविणार असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जाहिर केले. 

         आष्टी,पाटोदा,शिरूर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात आष्टी येथील लक्ष्मी लाॅन्स येथे आज मंगळवार दि.21 रोजी सांयकाळी सहा वाजता आयोजीत कार्यक्रमात माजी मंञी पंकजा मुंडे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,भाजपा जिल्हाअध्यक्ष राजेंद्र म्हस्के,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता गोल्हार

आष्टी नगराध्यक्ष पल्लवी धोंडे,युवानेते जयदत्त धस,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डाॅ.अजय धोंडे,रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे, नगरसेवक सुनिल रेडेकर,जिया बेग,भारत मुरकूटे,किशोर झरेकर,अक्षय धोंडे,शेख शरीफ, दादासाहेब गर्जे,गणेश शिंदे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना माजी मंञी पंकजा मुंडे म्हणाल्या,

मी आज छोट्याखानी बैठकीला आले पण याचे रूपातंर मेळाव्यात झाले हे पाहून मला भाजपाची ताकद कळाली आहे.मी सत्तेच्या काळात केलेले कामे पाहून मी गावा गावात पोहचले असल्याचे मला आज कळाले आहे.मी कोणत्याच गावात मताचा विचार न करता व दुजाभाव न करता विकास कामांना प्राधान्य दिले आहे.आता येणा-या निवडणुकीत मी स्वत;लक्ष घालणार असून,प्रत्येक गटात माझी स्वत;ची कोअर कमिटी असणार आहे.हि जिल्हा परिषद ताब्यात आणण्यासाठी तुम्ही एकजूटीने तयार रहा आणि जिल्हापरिषिद ताब्यात आणा असे आवाहनही यावेळी मुंडे यांनी केले.आ.सुरेश धस म्हणाले,पंकजा मुंडे यांच्याकडे लोकांची आशा आपेक्षा असल्याने त्यांना बैठकीस येण्यास उशीर झाला.ज्या वेळेस पंकजा ताई या जिल्ह्याच्या पालकमंञी होत्या त्यावेळेस आणि आजपर्यंतचे सर्व पालकमंञी एका बाजूला होते.कारण त्यांच्या काळात त्यांनी विकास कामात कधीच विचार केला नाही.अन् हिच कामाची पावती म्हाणजे आजचा मेळाव्यासाठी झालेला उशीर आहे.जिल्हा नियोजन समितीत अंधा धुंद कार्यक्रम सुरू असून,तीनशे-तीनशे मिटरचे कामे देत असून,ते फक्त सत्ताधारी लोकांनाच मिळाले पाहिजे अशी भूमिका सध्याच्या पालकमंञी यांनी केला आहे.जिल्ह्यात कुणाचाच कुणाला मेळ लागत नाही.मग पंकजा ताई म्हणाल्या की जिल्ह्यात माफिया राज आहे तर त्यात गैर काय?बीड-नगर या मतदार संघात म्हसोबावाडी जवळ अपघात होऊन एकाच कुटूंबातील चार जणांना जीव गमवावा लागला या रस्तावर फलक लावण्यासाठी दोन कोटीचे टेंडर निघाले पण हे आपल्या मर्जीतील कंपनीला हे टेंडर मिळावे म्हणून या मतदार संघाचे लोकप्रतिनींनी अडविले असल्याचा आरोपही आ.धस यांनी यावेळी केला.माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले,गेल्या पाच वर्षापासून मी आणि सुरेश दोघे मिळवून भाजपाचे काम करत आहोत.पण मलाच नेहमी दगा फटका होतो.त्यामुळे येणा-या जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणूकीत स्वत;पंकजा मुंडे यांनी लक्ष घालून बीड जिल्ह्याची जिल्हा परिषद ताब्यात आणण्याचा वडिलकीचा सल्ला माजी आ.भीमराव धोंडे यांनी आपल्या भाषणातून दिला.भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के म्हणाले,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीला वेळ जरी असला तरी पंकजा मुंडे यांनी ठरविले की आपण आत्ताच जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात कार्यकर्ता मेळावा घेयचा आणि त्याची सुरूवात आष्टी मतदार संघापासून सुरू केली असल्याचे त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे सुञसांचालन माऊली जरांगे यांनी करून आभार मानले.

Tuesday 21st of June 2022 09:33 PM

Advertisement

Advertisement