Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ऊस पिकाला फाटा देऊन जिरेनियम शेतीकडे शेतकऱ्यांचा वाटचाल

धारूर  - धारुर तालुक्यातील आसरडोह .येथील शेतकरी (ग्राम रोजगार सेवक ) वसंत देशमुख यानी पारंपरिक पिकाला फाटा देत आपण काहीतरी नवीन प्रयोग  करावे या उद्देशाने त्यांनी एक ते दोन एकर वर  जिरेनियम ची लागवड पोकरा मार्फत स्वतः च्या शेतात  केलेली आहे .इतर शेतकऱ्यांनीही जिरेनियम ची शेती करावी असा सल्ला त्यांनी बाकी शेतकऱ्यांना दिला  आहे . एका रोपाची किंमत नर्सरीमध्ये पाच रुपये असून एक एकर साठी (साठ हजार )रुपयाची रोपे लागतात या पिकाची कापणी वर्षातून तीन वेळा केली जाते एका झाडाला दोन ते अडीच किलो पाला निघतोआणि या पाल्यापासून कार खाण्या मध्ये तेल काढले जाते व यापासून वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम सेंट अत्तर असे सुवासिक तेल बनवले जाते .याची विक्री  कारखानदार  थेट शेतातून  करतात त्यामुळे विक्रीसाठी येणारी अडचण शेतकऱ्याला येत नाही याचा भाव जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपये  क्विंटल आहे .या शेतीसाठी लागणारा खर्च कमी असून याला कोणत्याही प्रकारचे जस्त प्रमाणात  खत किंवा फवारण्या करण्याची आवश्यकता नाही हे पिक गवतासारखी असून पाणी असले की भरपूर प्रमाणात वाढते वर्षाकाठी याच्या तीन छाटणी केले जातात .जिरेनियम ची रोपे एकदा लावली की ती पाच वर्षे राहातात परत पाच वर्षानंतर च दुसरी  लागवड करावी लागते . एखदा लावले कि पाच वर्षे नविन रोपे लागवण्या ची आवश्यकत भासत नाहि . इतर शेतकऱ्यांनीही जिरेनियम ची शेती करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावे कमी खर्चामध्ये परवडणारी ही शेती असून याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जिरेनियम ची लागवड करावी आणि ऊसापासून आपली सुटका करून घ्यावी ऊस हे पीक बारमाही असून परावलंबी झालेले आहे इथे कारखानदारांची मनमानी चालते त्यामुळे शेतकऱ्याला कोणताही पर्याय उरलेला नाही कारखान्याने जर उसा  गाळपासाठी नेला नाही तर तो शेतात तसाच उभा ठेवावा लागतो तो ऊस तोडणीसाठी मजूर ही मिळत नाही आणि एवढा ऊस कुठे घालणार हा प्रश्न तरी सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे सध्या उसाचे क्षेत्र भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे या भागामध्ये कारखाने कमी कॅपिसिटी ची असल्यामुळे उसाचे गाळप यावर्षी पूर्ण होणार की नाही  हा प्रश्न सध्या तरी भेडसावत आहे या तापातून सुटका होण्यासाठी शेतकऱ्याने जिरेनियम शेती फुल शेती फळबागअसे वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतामध्ये करावेत असे पत्रकार विठ्ठल वाघमोडे यांनी यावेळी सांगितले त्यांनीही वसंत देशमुख यांच्या जिरेनियम शेती ला नुकतीच भेट देऊन वसंत देशमुख यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या .

या वर कोणत्याही प्रकारच रोग पडत नाही . याला कोणतेच प्राणी पक्षी रानडुकर हरिण खात नाही . मग रात्री राकन करण्याची गरज नाही. एकरी दोन लाख रुपये वर्षीक उत्पदन खर्च वजा जाता शिल्लक राहाते .

- वसंत देशमुख 

 शेतकऱ्यांनी आधुनिक  प्रकारचीशेती करत असताना जास्त पाणी लागणारी पिके घेऊ नये उदा ऊस केळी हि पिके टाळावित .

-समाधान वाघमोडे , मंडळ कृषी अधिकारी धारूर

Wednesday 18th of May 2022 12:01 PM

Advertisement

Advertisement