Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सिरसाळा : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. यात डोक्याला मार लागल्याने दुचाकी स्वार तरुन जागीच ठार झाला. 15 मे रोजी 10.30 च्या सुमारास कौडगाव हुडा पाटी जवळ हा अपघात घडला.
सुजान प्रल्हाद गडदे (27 रा.सोनखेड,ता.सोनपेठ जि.परभणी) असे मयताचे नाव आहे. याबाबत उमेश प्रल्हाद गडदे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार 15 मे रोजी 10.30 च्या सुमारास ऊस घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरने (क्र.एम.एच.44 एस 9753) दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली यात दुचाकीवरील सुजान गडदे हा तरुण खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध सिरसाळा ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल झाला.

Tuesday 17th of May 2022 09:37 PM

Advertisement

Advertisement