Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

केतकी चितळेवर अंबाजोगाईतही गुन्हा दाखल

अंबाजोगाई - ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमातून आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याप्रकारणी अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात देखील गुन्हा नोंद करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. दरम्यान, आज मंगळवारी (दि.१७) सकाळीच राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी देखील चितळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

 केतकी चितळे हिने फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुक आणि ट्वीटरवर आक्षेपार्ह्य, बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट केली होती. तसेच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदन्मी केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली. सध्या ती तुरुंगात असून १८ मे पर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही तिच्यावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरु च आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या तक्रारीवरून केतकीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अंबाजोगाईत राष्ट्रवादीचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दरम्यान, मंगळवारी सकाळी अम्बजोई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जेष्ठ नेते राजकिशोर मोदी, ता.अ. ताराचंद शिंदे, महादेव आदमाने, अमर देशमुख, तानाजी देशमुख, भिमसेन लोमटे, दत्ता सरवदे, सुधाकर म्हाले, सुगत सरवदे, जावेद गवळी, अकबर पठाण, इश्वर मुंडे यांच्यासह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday 17th of May 2022 01:53 PM

Advertisement

Advertisement