बौद्ध धम्म आचरणाने अवगत होतो - भन्ते बी.धम्मसेन
शहरातून निघाली बुद्ध धम्म चेतना रॅली
आंबाजोगाई - विश्वाला शांतीचा ,समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंती निमित्त आज अंबाजोगाई शहर धम्म चेतना रॅली ने बहरून निघाले.सम्पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबाजोगाई च्या वतीने या भव्यचेतना रॅलीचे आयोजन करण्यात आले होतें.या रॅली मध्ये शहरातील बहुसंख्य बौद्ध उपासक-उपासिका सहित भन्ते बी.धम्मसेन बोधी यांचा भिक्कु-श्रामनेर संघ उपस्थित होता. या रॅली मध्ये शहरातील लहान थोर उपासक-उपासिका उपस्थित होत्या.
या धम्मचेतना रॅलीला कास्ट्राईब संघटनेच्या वतीने फलहार वाटप करण्यात आले या धम्म चेतना रॅलीचा समारोप संघभूमी येथे करण्यात आला.या वेळी भारतीय बौद्धमहासभेचे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष श्रीराम मोरे यांच्या हस्ते व विभागीय सचिव के.आर.पडवळ यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. बुद्ध जयंती निमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तालुक्याचे संस्कार उपाध्यक्ष दिलीप वाघचौरे होते.या वेळी मंचावर विभागीय सचिव,के.आर.पडवळ ,जिल्हाधक्ष्य श्रीराम मोरे, कोषाध्यक्ष संभाजी सोनवणे जिल्हा कार्यकरणीतील माधव काळे, प्रा. श्रीपती वाघमारे,एन. बी.राजभोज,सुधा जोगदंड,डॉ. संतोष बोबडे उपस्थित होते.या नंतर बीड जिल्हा बीड पूर्व चे सरचिटणीस बाबासाहेब धन्वे यांनी २२ प्रतिज्ञा चे वाचन करून,भन्ते बी.धम्मसेन यांच्या उपस्थितीत उपस्थिताना धम्म दीक्षा देण्यात आली. यावेळी दहा दिवसीय बौद्धांचार्य - श्रामनेर संघाचे मनोगत ऐकण्यात आले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यधक्ष्य श्रीराम मोरे यांनी उपस्थित उपासकाना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की धम्म प्रसार प्रचारामध्ये गती येणे महत्वाचे आहे.उपस्थित उपासकानी भारतीय बौद्ध महासभेला सहकार्य करावे.कारण धम्मप्रचार प्रसारा मध्ये भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण विश्वामध्ये नंबर एकवर आहे.या वेळी विभागीय सचिव के.आर.पडवळ म्हणाले की आपण दीक्षा घेऊन ६६ वर्ष झाली तरी आपण बुद्ध झालेलो नाहीत.अंधश्रद्धा दूर करुण धम्माआचरण करावे. असे पडवळ म्हणाले.
पूज्यभन्ते धम्मसेन बी. बोधी यांनी सर्वांना धम्मदेसना दिली. ते म्हणाले की ज्या-ज्या देशांनी बुद्ध नाकाराला त्यांचा विकास खुंटलेला असतो.बुद्धधम्म जीवनाला वळण लावतो, जीवनाचा विकास करतो. बौद्ध धम्म हा वैज्ञानिक आहे.आचारण शिलतेवर आधारित आहे.
बुद्ध जयंतीच्या या कार्यक्रमासाठी तालुका संस्कार उपाध्यक्ष दिलीप वाघचौरे,शहराध्यक्षा भावना कांबळे, देविदास घोबाळे, रुखमाजी जोगदंड, कासारे .दीक्षा प्रमाणपत्र लिहिण्यासाठी शहराच्या सचिव जयश्री गावडे, संजीवनी धन्वे,आयु. तरकसे यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे संचालन बाबासाहेब धन्वे यांनी तर उपस्थितांचे आभार देविदास घोबाळे यांनी मानले.या शिबिरास राजकिशोर मोदी,संतोष शिनगारे, बालासाहेब सोनवणे, अतुल कसबे यांचे सहकार्य लाभले.
