Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाईत १९ मे रोजी इतिहास संशोधक प्रा.गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान

मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे- संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांचे आवाहन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुरूवार, दि.१९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृह, नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा इतिहास संशोधक प्रा.गंगाधर बनबरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानास शहर व परिसरातील प्रवर्तनवादी चळवळीत कार्यरत तसेच शिव-शंभू प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केले आहे. मागील १३ वर्षांपासून हा प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे १३ वे वर्ष आहे.

शहरातील नगरपरिषदेच्या लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात गुरूवार, दि.१९ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा इतिहास संशोधक प्रा.गंगाधर बनबरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती,अंबाजोगाईचे अध्यक्ष सुनिलकाका लोमटे तर यावेळी विचारमंचावर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई शेंडगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमास व व्याख्यानास शहर व परिसरातील प्रवर्तनवादी चळवळीत कार्यरत तसेच शिव-शंभू प्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी केले आहे.


Monday 16th of May 2022 06:55 PM

Advertisement

Advertisement